मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी वडगाव शेरीच्या एका सोसायटीत राहते. तिने एक श्वान पाळला. तिने आपल्या श्वानाला कल्याणीनगरच्या एका पेटशॉप मध्ये 28 सप्टेंबर रोजी देखभालीसाठी पाठविलं. तिथे पेटशॉप मध्ये कर्मचाऱ्यांनी श्वानाला अंघोळ घातली आंघोळ घातल्यावर लगेच श्वानाला उलटी झाली नंतर त्याचा मृत्यू झाला.
तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्राणी क्रुरता प्रतिबंधक अधिनियम कलम 11, तसेच अन्य कलमांन्वये पेटशाॅपच्या मालकासह कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस पुढील तपास करत आहे.