चार ते पाच दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. ही घटना सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर आटकवडे शिवारात रात्री नऊच्या सुमारास घडली. यामध्ये अन्य दोन जण जखमी झाले आहेत.अमोल विलास शिंदे वय-24 रा.ठाणगाव,ता.सिन्नर) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे.
अमोल शिंदे हे चार-पाच दिवसांपूर्वी सुट्टीवर आले होते. वैयक्तिक काम आटोपून दुचाकीवरुन सिन्नर येथून आपल्या मित्रांसोबत ठाणगावकडे निघाले असताना हा अपघात झाला.अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही.अमोल शिंदे सध्या पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बाजावत होते.ते अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.