भारतीय संस्कृतीमध्ये सौभाग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पती असलेले महिला मंगळागौरीपासून तर शेवटपर्यंत सण साजरे करतात. मात्र, विधवासाठी कुठलाही सण समारंभ नसतो. याच परंपरेला फाटा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अमरावती येथे महिलांचे सोबत वटपौर्णिमेचे पूजन करून एक नवा पायंडा अमरावतीत पाडला आहे. सुप्रिया सुळे यांनी वडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी करत केली आहे, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी त्यांनी खास उखाणा सुद्धा घेतला. ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास सदानंदराव फस्ट क्लास, असा उखाणा सुप्रिया सुळे यांनी घेतला.