डॉ. रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल

शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (15:18 IST)
बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असताना पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी शासनाची दिशाभूल करून काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. भारतीय टेलिग्राम ऍक्टचा गैरवापर करणारी आणि संबंधितांच्या खासगी आयुष्यावर आघात करणारी ही कृती असल्याचे म्हटले जात आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या रश्मी शुक्ला हैद्राबाद येथे कार्यरत आहे. याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार डॉ. रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर शुक्ला यांच्यावर आयपीएस अधिकारी असून त्यांनी पदाचा दुरुपयोग करत राज्यसरकारची गोपनीय माहिती लीक केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती