स्वत:च्या भाषेवर हसणं आधी बंद करा - राज ठाकरे

शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (12:02 IST)
"मराठी भाषा ही जगातील प्रमुख दहा भाषांपैकी एक आहे. ती सहजासहजी मरणार नाही, नष्ट होणार नाही. पण मराठी भाषा टिकण्यासाठी प्रत्येकाने मराठीत बोललंच पाहिजे. आपल्याला आपल्या भाषेत स्वीकारतील की नाही हा विचार कशाला? शहरी आणि ग्रामीण भाषा असा भेद नको. पाणी म्हटलं काय आणि पानी म्हटलं काय, लगेच गावंढळ म्हणून मोकळे होतात. पण त्यात गावंढळ काय? आपण आपल्या भाषेवर हसणं आधी बंद केलं पाहिजे," असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

"तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम राहिलात तर समोरचा तुमची भाषा समजून घेतो. स्वत:च्या भाषेची लाज बाळगणं आधी बंद करा.
 
दक्षिणेतील लोक त्यांच्या भाषेवर ठाम असतात. गुजरातमध्ये गुजराती बोलतात. मग आपल्याला मराठी बोलण्यात, मराठीच्या बोर्ड बाबत अडचण काय"? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
 
'मराठी भाषा हे तुमचं अस्तित्व आहे. ते टिकवणं गरजेचं आहे. मराठी भाषा कशासाठी पाहिजेत हे आम्हाला विचारतात. काय गरज आहे, कशाला पाट्या हव्यात वगैरे असं विचारलं जातं. पण या मूठभर लोकांकडे दुर्लक्ष करायचं असतं,' असं राज ठाकरे म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती