ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले नेमाडे हे मराठी साहित्यातील चौथे साहित्यिक ठरले आहेत. त्यांच्या हिंदू, कोसला या कादंबरी गाजल्या आहेत. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नेमाडे यांनी आपणास आनंद झाल्याची भावना व्यक्त केली आहे.