✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्री रामाचे अभंग मोक्षोपाय
Webdunia
मंगळवार, 28 मार्च 2023 (14:07 IST)
भक्तांचा भवशोक गाढ रजनी नासावया जो रवी ।
भक्तांचा भवमोह नष्ट करुनी ज्याची कृपा ज्ञान वी ॥
भक्तां हिंसक दुष्ट दैत्य भव यान्नामेचि जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥१॥
जो अज्ञानमदांधदैत्यदमनीं वीराग्रणी कीं असे ।
देवा सोडविता समर्थ प्रभु हा यावीण त्राता नसे ॥
देहाहंकृतिमत्तरावण असा ज्या योगि जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥२॥
वैराग्यात्मक द्या सदा मन महारुद्रासि या चेतना ।
सीता स्वानुभवात्मिका जननि जैं व्हावी तुम्हां पालना ॥
ज्याचा आश्रय लाभतांचि विषयव्यामोह जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥३॥
मी गोरा बहु वा कुरुप मज हें तारुण्य वृद्धाप्य वा ।
मी हा ब्राह्मण क्षत्र वा वणिज वा मी शुद्र आलों भवा ॥
श्रीमान् विश्व दरिद्रि स्त्री पुरुष मी हा भाव जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥४॥
मी थोटा बहिरा मुका असत मी पंगू तसा अंध वा ।
मी हा चंचल धीत भ्याड जड वा विद्वान्सुखी खिन्नवा ॥
मी हा बद्ध विमुक्त शिष्य गुरु वा हा भाव जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥५॥
जें सच्चिद्घन दिव्य सौख्य मिति ज्या लाभे न वेदांतरीं ।
जे का वेद वदे स्वरुप असकें तें रामरुपांतरीं ॥
येतां प्रत्यय हा न दुःख भविचें भिन्नत्व जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥६॥
योगायोगिं वसे तनू न कसला त्या पाश विश्वांतरीं ।
ज्यातें ब्रह्मचि मी अखंड असतें रामकृपें अंतरीं ॥
मी, हा हें मम या न बंध कसला अज्ञान जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥७॥
मी मी जें निज अंतरीं स्फुरत तें पुर्वील सच्चित्सुखीं ।
नेवोनी विलया त्यजूनि अवघें श्रीराम ठेवा मुखीं ॥
संसारीं प्रभुभक्ति धर्म जगवा जीवत्व जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥८॥
माझ्या अंतरिं जें असें प्रगटलें तें दाविलें हें असें ।
जाणोनि निजरुपिं चित्त जडवा श्रीराम त्राता वसे ॥
ऐक्यत्वें जरि रामपाद गवसे मायाहि जीवा मुके ।
ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥९॥
रचनाकार - श्रीधरस्वामी महाराज
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
श्रीरामाचा धांवा Shri Ramacha Dhava
RamNavami 2023 चित्रकूटची रामनवमी अयोध्येपेक्षाही खास, जाणून घ्या तिचं महत्त्व
रामरक्षा स्तोत्र मराठी अर्थासहित Ram Raksha Stotra
रामाचे वंशज कोण? जाणून घ्या संपूर्ण माहिती
रामचंद्रांची आरती Shriram Aarti Marathi
सर्व पहा
नवीन
रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती
Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा
श्री सूर्याची आरती
रविवारी करा आरती सूर्याची
कुळदेवी-देवता स्वप्नात का दिसतात? यांचा अर्थ काय चला जाणून घेऊ घ्या
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
पुढील लेख
रामचंद्राचीं आरती