पुणे : अजित पवार मला काय म्हणतात याचे मला घेणे नाही. लोक मात्र माझ्याबाबतीत शांत आहेत, संयमी आहेत, चांगले बोलतात, अंगावर धावून येत नाहीत. कामे करतात असे बोलतात ते महत्त्वाचे आहे. अजित पवारांना स्वत:वर झालेला अन्याय शब्दबद्ध करता येत नाही. ते सांकेतिक भाषेत बोलत राहतात. त्यामुळे अजित पवार आपल्यावर काय अन्याय झाला आहे ते पत्रकार परिषद घेऊन सांगावे असे, प्रत्युत्तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना दिले.
महायुतीमधल्या घटक पक्षांचा या निवडणुकीबाबत मेळावा झाला. या मेळाव्याला सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मेळाव्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची घर फोडण्याची मोठी परंपरा आहे. त्यावर लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे. सत्ता आल्यानंतर त्याचा दुरुपयोग कोणी केला, विश्वासघात कोणी केला. उद्धवजींची शिवसेना रोज उठून गद्दारी केली म्हणत आहे. तुम्ही 2019 ला काय केले. तुम्ही गद्दारीच केली ना. राष्ट्रवादी म्हणत आहे. यांनी यांची माणसे पळवली. पण तुम्ही आमच्या उद्धवजींना पळवले. आमचे अतिशय गुण्यागोविंदाने चालले होते. तुम्ही त्यांना फितवले, पळवले अशा शब्दात नाना पटोले यांच्यावर पाटील यांनी आगपाखड केली.