बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यासाठी विधानभवनात सरकारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि मंत्री उपस्थित होते.
सरकारी कार्यक्रमात नारायण राणेंनी नीलम गोऱ्हेंशी घातली हुज्जत
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या सरकारी कार्यक्रमात सरकारच्यावतीने अनेक नेत्यांनी भाषणं केली. पण या कार्यक्रमात एक विचित्र प्रकार घडला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्याशी भर कार्यक्रमात हुज्जत घातली. नारायण राणे यांच्या औचित्यभंग करणाऱ्या भाषणावर नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप घेतला. तसेच भाषण थांबवण्याची विनंती केली होती. पण नारायण राणेंनी भाषण थांबवण्यास नकार दिला. मी बसून बोलणाऱ्या लोकांचं ऐकत नाही, असं उलट उत्तर राणेंनी दिलं. यावेळी अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.