ते म्हणाले, सध्या मणिपूरातील परिस्थिती कठीण आहे.मणिपूरात सुरक्षेची कोणतीही हमी नाही. स्थानिकांच्या सुरक्षितेची चिंता आहे. संघाचे कार्यकर्ते दोन्ही गटांना मदत करून वातावरण सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. व्यवसायासाठी किंवा समाजसेवेसाठी जाणाऱ्या लोकांसाठी आव्हानात्मक स्थिती आहे.
संघाचे कार्यकर्त्ये राष्ट्रीय एकात्मकतेची भावना वाढविण्यासाठी काम करत आहे. ते संघर्षग्रस्त मणिपूर मध्ये खंबीरपणे उभे आहे. स्थनिकांना त्यांच्यावर विश्वास बसत आहे. ज्या शक्तींना भारताची प्रगती आवडत नाही ते नक्कीच अडथळे निर्माण करतील. कारण भारताची प्रगती झाल्यामुळे त्यांची शक्ती नष्ट होणार. मणिपूरात मिताई आणि कुकी या दोन जातींमध्ये वाद सुरु आहे.