बारामती बसस्थानकाची स्थिती दयनीय झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने जुन्या बसस्थानक जागेत नवीन सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा असलेले बसस्थानक उभारण्यात येत आहे. राज्यातील सर्वाधिक सुंदर व प्रशस्त बसस्थानक बारामतीत आकार घेऊ लागले आहे. हे बसस्थानक 6 महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती एसटी पुणे विभागाचे प्रमुख रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.
बारामती येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या बसस्थानकाला 50 कोटी रुपये खर्च येणार आहे. या बसस्थानकाची इमारत विमानतळाच्या तोडीची असणार आहे. नव्या बसस्थानकामध्ये 22 बसथांबे असणार आहेत. तेसच डेपोच्या पार्किंगमध्ये रात्री जवळपास 87 बसेस उभ्या राहतील. याशिवाय 12 दुकान गाळे असणार असून यामध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी कँटीनची सोय केली जाणार आहे.