महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आईनंही अनुभवलं सेल्फीचं जग; महापौरांची भावनिक प्रतिक्रिया, सेल्फी ‘व्हायरल ’

बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (08:14 IST)
जगात एक सेल्फीचं ट्रेड सुरु आहे.सेल्फी कक्षात जादा तर अनेक तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर सक्रिय होताना दिसतात.मात्र चक्क एका महापौरांच्या आईनं सेल्फीचं जग अनुभवलं आहे.आपल्या आईनं काढलेल्या सेल्फीचा अविस्मरणीय क्षण पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवर शेअर करत आपल्या आईबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे.महापौर मोहोळ आणि त्यांच्या आईचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
पुण्याचे भाजपचे नेते आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्या पोस्टमध्ये त्यांची आई सेल्फी काढताना दिसत आहे. तर, हा फोटो शेअर करताना महापौर मोहोळ यांनी एक भावनिक शीर्षक देखील दिलं आहे. ‘जेमतेमच अक्षर ओळख असणारी माझी आई ‘चल रे सेल्फी काढू’ म्हणून ‘सरप्राईज’ देते तेव्हा..लव्ह यु आई!’ अशी प्रेमळ आणि भावनिक कॅप्शन देत आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. दरम्यान, मायलेकाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.अनेकांनी यावर भावनिक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती