नवीन कात्रज बोगद्याजवळील डोंगराला भीषण आग

गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (07:42 IST)
नवीन कात्रज बोगद्याजवळील डोंगराला भीषण आग लागली आहे. पुण्यातील कात्रज घाटातील शिंदेवाडी गावाजवळ असणाऱ्या डोंगरावर हा वणवा पेटला आहे. ही आग आणखी पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सातारा हायवेजवळच्या शिंदेवाडी गावातील डोंगरावर संध्याकाळी उशिरापासून वणवा पेटला आहे. नवीन बोगद्याच्यावर कात्रज घाटात शिंदेवाडीच्या अगोदर ही आग लागली आहे. जवळपास चार ते पाच किमीपर्यंत ही आग पसरली असल्याचे बोललं जात आहे.
 
घनदाट जंगलात लागलेल्या आगीमुळे अनेक झाडं जळून खाक झाली आहे. तसेच पक्ष्यांच्या घरट्यांचेही नुकसान झाल्याचे बोलल जात आहे. ही आग भीषण आहे. वाऱ्यामुळे ही आग पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान आग लागलेली जागा ही खासगी आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती