पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सीओईपी जम्बो रुग्णालय पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. येत्या सोमवार पासून हे रुग्णालय सुरु होणार होते. मात्र त्यापुर्वीच ही वीज तोडली गेली आहे. थकबाकी राहिल्याने वीज तोडली गेली आहे.
मध्यंतरी जम्बो मधल्या एका विभागाची वीज फक्त तोडली गेली आहे. तिथल्या मिटर रिडींग बाबत अडचण होती. त्यामुळे हे बील भरण्यात आले नव्हते. आम्ही ही रक्कम भरुन वीज पुन्हा सुरु करुन घेवु “असे दिपाली इन्फ्राचे रोहीत छेत्री यांनी सांगितले.
महावितरणने पुण्यात जम्बो रुग्णालयाची वीज तोडली.मात्र पालिकेच्या पाणी विभागाने या कारवाईला एकप्रकारे जोरदार प्रत्युत्तर देत महावितरणच्या वसाहती आणि पाच कार्यालयांचेच पाणी तोडले.