मिळालेल्या माहितनुसार दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी मंगळवार, २५ मार्च रोजी भाजप सरकारने सादर केलेल्या दिल्ली अर्थसंकल्प २०२५ चा तीव्र निषेध केला आणि त्याला “हवा-हवाई” अर्थसंकल्प म्हटले. माध्यमांशी बोलताना आतिशी यांनी दावा केला की १ लाख कोटी रुपयांचे हे बजेट निराधार आहे कारण दिल्ली सरकारकडे त्या प्रमाणात उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही. "आज भाजपने विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाला एका शब्दात 'हवा-हवाई' म्हणता येईल, असे आपच्या आतिशी म्हणाल्या. शहराच्या आर्थिक स्थितीचे खरे चित्र सादर करणाऱ्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अनुपस्थितीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिल्लीतील सरकारी शाळा व्यवस्था नष्ट करण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे, असा आरोप आतिशी यांनी केला कारण शिक्षण बजेट १९% पर्यंत कमी करण्यात आले आहे, जे गेल्या १० वर्षातील सर्वात कमी आहे.
अतिशी म्हणाल्या, "आर्थिक सर्वेक्षण विधानसभेत का सादर केले गेले नाही? भाजपने कोणताही आधार नसलेला अर्थसंकल्प सादर केला आहे. १० वर्षात प्रथमच शिक्षण बजेट २०% पेक्षा कमी झाले आहे. शिक्षणासाठी बजेटच्या फक्त १९% रक्कम ठेवण्यात आली आहे, यावरून असे दिसून येते की भाजप सरकारी शाळा रद्द करू इच्छित आहे." असे देखील त्या म्हणाल्या.