पुण्यातील भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीचा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे प्रसूती दरम्यान मृत्यू झाला.त्यांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.
सदर प्रकरण पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आहे. पुण्यातील भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या घरी आठ वर्षानंतर पाळणा हलणार होता. त्यांनी प्रेम विवाह केला असून पुण्यातील कर्वे नगर येथे राहत होत्या आठ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला आणि ते पालक होणार होते. त्यांची परिस्थिती बेताची होती.
त्यांची पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूती कळा सुरु झाल्या त्यांना पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांनी जुळी मुलं असल्याचे सांगितले. पण प्रसूती किचकट आहे त्या साठी 20 लाख रुपये लागणार. त्यापैकी 10 लाख आता भरले तर प्रसूती करता येईल. भिसे कुटुंबीयांनी 3 लाख रुपये भरण्याचे सांगितले मात्र रुग्णालयातील प्रशासनाने 10 लाख रुपयांसाठी अडून बसले.
या सर्व प्रकारामुळे 3 तास झाले. तनिषा यांना प्रसूतीकळा सुरूच होती. त्यांचे बीपी वाढले. त्यांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांनी प्रसूतीदरम्यान दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आणि त्यांची प्राणज्योती माळवली. दोन चिमुकल्यांना सोडून त्यांची आई कायमची निघून गेली.
या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळून येत आहे. मयत तनिषाला वेळीच उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांना वाचवता आले असते. रुग्णालयाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तनिषाचा मृत्यू झाल्याचा आरोप भिसे कुटुंबीयांनी केला आहे.