पुणे पोर्श कार प्रकरण नंतर मुंबई पोलिसांनी बार आणि पबची चौकशी सुरु केली, 5 विरुद्ध कारवाई

मंगळवार, 28 मे 2024 (09:33 IST)
हिट अँड रन ची ही घटना 19 मे ला पुण्यामधील कल्याणी नगर परिसरात घडली होती. एका अल्पवयीन तरूणाने आपल्या स्पोर्ट कार पोर्श ने बाईकवर असलेल्या दोन जणांना चिरडले होते. ज्यामध्ये दोघांनाचा मृत्यू झाला होता. 
 
महाराष्ट्रातील पुणे पोर्श कर अपघात प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी शहरातील पब ची चौकशी सुरु केली आहे. रविवारी आणि सोमवारी पोलिसांनी 50 जागांवर धाड टाकली. तर पाच बार विरोधात कारवाई केली. मुंबई पोलिसांनी पुण्यामधील अपघाताला गंभीरतेने घेतले आहे. पोलिसांनी रविवारी आणि सोमवारी 50 जगणावर धाड टाकली. तसेच पाच बार विरोधात कारवाई केली आहे. 
 
काय आहे प्रकरण? 
हिट अँड रन ची ही घटना 19 मे ला पुण्यामधील कल्याणी नगर परिसरात घडली होती. रियल एस्टेट डेव्हलपर विशाल अग्रवाल याच्या 17 वर्षाच्या मुलाने आपल्या स्पोर्ट कार पोर्श ने बाईकवरील दोन जणांना चिरडले होते ज्यामध्ये एक तरुण आणि एक तरुणी होती ज्यांच्या जागीच मृत्यू झाला. तसेच या घटनेच्या 14 तासानंतर अल्पवयीन आरोपीला जमीन मिळाला. पोलिसांनी चौकशी केली असता हा आरोपी नशेमध्ये होता. व जलद गतीने गाडी चावलत होता. जमीन मिळाल्यानंतर त्याला परत अटक करण्यात आली व आता त्याला बाल सुधार गृहामध्ये पाठवण्यात आले आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती