देवीचे तिसरे रूप : भक्तांच्या संकटाचे निवारण करणारी देवी चंद्रघंटा

Webdunia
बुधवार, 24 सप्टेंबर 2025 (08:18 IST)
दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव 'चंद्रघंटा' आहे. नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी या देवीची पूजा केली जाते. तसेच संकट निवारणासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते. चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन होते.
ALSO READ: Chandraghanta Devi : नवरात्रीची तिसरी देवी, चंद्रघंटा, यांची पूजा करण्यासाठी 4 मंत्र
दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारचा दिव्य आवाज ऐकायला येतो. हे क्षण साधकासाठी अत्यंत सावधान राहण्यासाठी असतात. देवीचे हे रूप परम शांतिदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला 'चंद्रघंटा देवी' असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते.
 
माँ चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. माँ भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तीच्या घंटेच्या आवाज प्रेतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या माँ देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतिपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास विरता-निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होवून संपूर्ण शरीरात कांती-गुणांची वाढ होते.
ALSO READ: Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्राचा तिसरा दिवस देवी चंद्रघंटा यांची कथा, मंत्र आणि पूजा पद्धत
आवाजात मधुरता येते. माँ चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात. आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हा. तिची उपासना केल्यामुळे सर्व सांसारिक संकटातून मुक्ती मिळते. आपण नेहमी तिची उपासना करण्यासाठी अग्रेसर असावे. इहलोक आणि परलोक दोन्हीच्या कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तिचे लक्ष आहे.
ALSO READ: चंद्रघंटा देवी आरती : जय मां चंद्रघंटा सुख धाम, पूर्ण कीजो मेरे काम
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते. या रूपांमध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते. चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते. देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते.
 
जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन, आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक बनते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतीक आहे
माँ चंद्रघंटाचा बीज मंत्र आहे - 'ऐं श्रीं शक्तयै नम:’'
Edited By - Priya Dixit  

संबंधित माहिती

पुढील लेख