केरळच्या कोचीन विद्यापीठात चेंगराचेंगरी, 4 ठार, 60 हून अधिक जखमी

Webdunia
शनिवार, 25 नोव्हेंबर 2023 (21:37 IST)
Stampede in Cochin University Kerala : केरळमधील कोचीन विद्यापीठात चेंगराचेंगरीच्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चेंगराचेंगरीत 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यापीठातील कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी झाली होती.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोची युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सुरू असलेल्या टेक फेस्टदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 60 जण जखमी झाले. टेक फेस्टमध्ये गाण्याचा कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली.

संबंधित माहिती

पुढील लेख