दिल्लीतील शनिधामचे संस्थापक दाती महाराज यांच्यावर त्यांच्या एका महिला शिष्याने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी दाती महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर दाती महाराजांवर दिल्ली पोलिसांनी भादंवि कलम३७६, ३७७,३५४, आणि ३४ यांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
दोन वर्षांपूर्वी महाराजांनी शनिधाममध्ये आपल्यावर लैंगिक अत्याचार केला असून याबद्दल कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मी गप्प होते, असे पीडित महिलेने म्हटले आहे. त्याचबरोबर महाराजांनी अनेक महिलांवर अत्याचार केले असल्याचा गौप्यस्फोटही या महिलेने केला आहे.