उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजप आमदार कुलदीप सेंगरला अटक

शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (08:56 IST)

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगरला शुक्रवारी 13 एप्रिलला सकाळी 4.30 च्या सुमारास लखनऊच्या आमदार निवासातून  सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने या प्रकरणात 3 वेगवेगळ्या केस दाखल केल्या आहेत. गुरूवारी रात्री उत्तर प्रदेश पोलीस आणि सीबीआय अधिकारी यांच्यात बैठक झाली ज्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची चर्चा झाली. अटक करण्यापूर्वी सीबीआयने पोलीस अधिक्षक आणि उत्तर प्रदेशचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक यांची भेट घेतली. भाजप अधिकाऱ्यांनी 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सीबीआयने 12 एप्रिल रोजी चौकशी सुरू केली. पीडित मुलीने रविवारी 8 एप्रिल रोजी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्याविरोधात पोलीसांचा निष्क्रियपणा समोर आणण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. 

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सामुहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलायबांगरमउ मतदारसंघातील भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर आणि त्यांच्या साथीदारांनी एका वर्षापूर्वी सामूहीक बलात्कार केल्याचा आरोप पीडित मुलीनं केलाय. या मुलीनं मुख्यमंत्री योग आदित्यनाथ यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. याचदरम्यान शस्त्रास्त्र कायद्याखाली अटकेत असलेल्या तिच्या वडिलांचा कोठडीतच संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे योगी सरकारवर  टीका झाली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती