पुणे मुलींसाठी असुरक्षित होत आहे की काय असे चित्र सध्या समोर येतय. यामध्ये एका रिक्षा चालकाने एका तरूणीवर अत्याचार केला असून तरूणीला त्याच्या मित्रांसोबत निर्जन स्थळी नेऊन, या मुलीवर अत्याचार केले. पोलिसांनी या घटनेची लगेच दखल घेतली आणि दोघा नराधमाना अटक केली असून एक फरार झाला आहे.
पुण्यात ही दुसरी धक्कादायक घटना आहे, गुरूवारी एका अल्पवयीन मुलीच्या रस्त्यावर छेडछा़ड करून, तिला जबर मारहाण केली होती. व्हि़डीओ व्हायरल झाल्यानंतर हे समोर आले होते.