Ranchi: महिलेने दिला एकाच वेळी 5 मुलांना जन्म, सर्व मुलं व्यवस्थित

Webdunia
मंगळवार, 23 मे 2023 (14:10 IST)
रांचीच्या RIMS मध्ये एका महिलेने एकत्र 5 मुलांना जन्म (Birth 5 children)दिला आहे. ही बातमी RIMS ने ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. आई आणि मूल दोघेही निरोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. नवजात बालक सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. सर्व मुलांचे वजन सुमारे एक किलो ते 750 ग्रॅम पर्यंत आहे. 
<

रिम्स के महिला एवं प्रसूति विभाग में इटखोरी चतरा की एक महिला ने पांच बच्चों को जन्म दिया है। बच्चें NICU में डाक्टरों की देखरेख में हैं। डॉ शशि बाला सिंह के नेतृत्व में सफल प्रसव कराया गया। @HLTH_JHARKHAND pic.twitter.com/fdxUBYoPoP

— RIMS Ranchi (@ranchi_rims) May 22, 2023 >
सर्व नवजात बालकांना निओनॅटोलॉजी विभागात दाखल करण्यात आले आहे. डॉ.शशीबाला सिंग यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी प्रसूती करण्यात आली.  मुलांचे वजन खूप कमी आहे. पाच मुलांना जन्म दिलेल्या महिलेचे नाव इटखोरी, चतरा येथील आहे सध्या आई आणि मुलांची प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांचे पथक आई आणि मुलांवर लक्ष ठेवून आहे. 
 
मुलं प्री-मॅच्युअर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांचा जन्म 26-27 आठवड्यात होतो. अशा परिस्थितीत, त्यांच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवणे आहे. आहे.मुलांची योग्य काळजी घेतली जात आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

पुढील लेख