Fire Near Vaishno Devi वैष्णो देवीच्या गुहे जवळच्या इमारतीत आग लागली

मंगळवार, 8 जून 2021 (18:03 IST)
कटरा जम्मूच्या कटरा स्थळी असलेले प्रख्यात वैष्णो देवीच्या मंदिराजवळ असलेल्या एका इमारतीस आज आग लागल्याचे वृत्त समजले आहे.ही आग कालिका इमारतीच्या काउंटर नंबर दोन नजीक लागली असून आग एवढी जास्त भीषण आहे की धूर दूरपर्यंत दिसत आहे.
 
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल स्थळी पोहोचले आहे.
जेथे आग लागली आहे ते ठिकाण माता वैष्णो देवीच्या गुहेपासून सुमारे 100 मीटरच्या अंतरावर आहे.
आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले आहे.आग इतकी भयानक आहे की ही वेगाने पसरली.श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांना याची सूचना देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. 
 
श्राइन बोर्डाचे सीइओ राकेश कुमार यांनी सांगितले आहे की परिस्थिती आटोक्यात आली असून आग विझविण्यात आली आहे.तसेच प्रवाश्यांचा प्रवास पुन्हा सुरु करण्यात आला आहे.कोणत्याही जानमालाच्या हानी ची माहिती नाही.घाबरण्याचे काहीच कारण नाही.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती