पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळल्याने 3 जिल्ह्यात 26 जणांचा मृत्यू

मंगळवार, 8 जून 2021 (10:24 IST)
पश्चिम बंगालमध्ये एकाच दिवसात वीज कोसळल्याने किमान 26 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी मध्यरात्री ते संध्याकाळपर्यंत दक्षिण बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि सतत वीज कोसळली. अशा परिस्थितीत घराबाहेर पडलेल्या बर्यायच जणांचा वीज पडल्याने मृत्यू झाला. पूर्व मेदनापूर आणि बांकुरामध्येही 2-2 लोकांचा मृत्यू झाला आहे. झारखंडामधील रामगड जिल्ह्यातील पश्चिम बोकारो ओपी भागात वीज कोसळल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला.
 
हुगळी जिल्ह्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर मुर्शिदाबाद जिल्ह्यात 9 लोकांचा मृत्यू झाला आहे तर पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. हावडा जिल्ह्यातही वीज कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून मरण पावलेल्यांसाठी संवेदना व्यक्त केल्या आणि नुकसानभरपाईची घोषणा केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती