उद्धव ठाकरे मोदींच्या भेटीला पोहचले

मंगळवार, 8 जून 2021 (11:05 IST)
नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या निवसस्थानी पोहोचले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हेही आहेत.
 
अशोक चव्हाण हे राज्य सरकारनं मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्षही आहेत.
 
पंतप्रधान मोदींसोबतची ही भेट प्रामुख्यानं मराठा आरक्षणावरील चर्चेसाठी आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली.
 
संजय राऊत म्हणाले, "पंतप्रधानांसोबत महत्त्वाची बैठक आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नक्की तोडगा निघेल."
 
"मराठा आरक्षणाचा केंद्राच्या अखत्यारित आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की, पंतप्रधानांसमोर स्वत: जाऊन हा मुद्दा मांडणं आवश्यक होतं. यातून तात्काळ मार्ग काढून मराठा समाजाला न्याय द्या, हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हण पोहोचले आहेत," असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती