PM Modi LIVE : 18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार

सोमवार, 7 जून 2021 (17:00 IST)
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कोरोनाव्हायरस काळात 9 व्या वेळी देशाला संबोधित करीत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की ...
 
 

05:35 PM, 7th Jun
नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना मोफत धान्य
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत धान्य
80 कोटींहून अधिक जनतेला मोफत धान्य

05:31 PM, 7th Jun
18 वर्षांवरील सर्वांना केंद्र मोफत लस देणार
21 जून पासून मोफत लसीकरण
देशातील लसीकरणाची जबादारी केंद्राची

05:25 PM, 7th Jun
21 जून पासून 18 वर्षांपासून अधिक वयाच्या लोकांसाठी केंद्र राज्याला मोफत लस उपलब्ध करुन देईल
भारत सरकार लसीकरणाबद्दल सर्व व्यवस्था सांभाळणार
दोन आठवड्यात ही व्यवस्था लागू होईल
नवीन गाईडलाइन्सच्या हिशोबाने सर्व पार पडेल

05:23 PM, 7th Jun
राज्य सरकारांना अधिकार दिले
केंद्रानं राज्याला गाईडलाइन्स दिल्या
1 मे पासून 25 टक्के हक्क राज्यांच्या हाती दिले
राज्यांना कठिण काळ कसा असतो याची जाणीव झाली
मे च्या दोन आठवड्याच्या आत राज्यांनी केंद्राची व्यवस्था चांगली असल्याचे म्हटले
वेळेवर राज्यांनी पुनर्विचारची मागणी केली

05:20 PM, 7th Jun
भारतात यद्धपातळीवर लसीकरणाचं कार्य सुरु
आरोग्यसेवकांच्या लसीकरणावर भर दिला
ज्यांनो कोरोनाचा धोका अधिक त्यांना आधी लस दिली
देशामध्ये इतर लसींनाही परवानगी
 लस संशोधनासाठी शास्त्रज्ञांचं कौतुक

05:15 PM, 7th Jun
23 कोटींहून अधिक नागरिकाचं लसीकरण
आज देशात सात कंपन्या विविध लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत
इतर देशातून लस खरेदी प्रक्रियेला वेग
मुलांसाठी वॅक्सीन ट्रायलवर वेगाने कार्य सुरु 
नेझल वॅक्सीनवर कार्य सुरु

05:11 PM, 7th Jun
इतर देशांमध्ये जेथे औषधे उपलब्ध होती, तेथे आणण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडली नाही
या अदृश्य व्हायरस विरूद्धच्या लढाईतील सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कोविड प्रोटोकॉल
लस आमच्यासाठी संरक्षण कवच आहे
देशानं मिशन मोडमध्ये काम केलं
देशात लस निर्माण ऐतिहासिक

05:09 PM, 7th Jun
आरोग्याच्या सुविधा अधिक प्रमाणात वाढल्या
लसीकरण हे सुरक्षा कवच
भारतीय लस नसती तर काय झालं असतं
दुसरी लाट अजून संपलेली नाही
कोरोनाशी लढाई अद्यापही सुरु

05:06 PM, 7th Jun
100 वर्षातील सर्वात मोठा (साथीचा रोग)
यापूर्वी इतकी ऑक्सिजनची गरज कधीच नव्हती
दुसर्‍या लाटेवर लढा सुरूच आहे
बर्‍याच लोकांचे प्रियजन हरवले आहेत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती