वाचा, रेल्वे विषयीच्या व्हायरल पत्रा मागचं सत्य काय आहे ?

मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (07:51 IST)
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून ३० सप्टेंबरपर्यंत लोकल सेवा, एक्सप्रेस आणि मेल बंद राहणार असल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याबाबतचं रेल्वेच्या एका पत्राचा हवाला देण्यात येत आहे. यात पत्रात मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर आणि उपनगरीय रेल्वे सेवा कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे असा दावा करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पत्राबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ११ मे रोजी रेल्वेकडून काढण्यात आलेल्या पत्रात विशेष ट्रेन्स वगळता उर्वरित रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित राहतील असं सांगितलं होतं. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत रेल्वे सेवा बंद राहतील याबाबत कोणतंही पत्र रेल्वे मंत्रालयाकडून काढण्यात आलं नाही. विशेष ट्रेन्स नियोजित वेळेनुसारच चालतील असं स्पष्टीकरण रेल्वेने दिलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती