गणेशोत्सवानिमित्त कोकणाकडे गाड्या रवाना, विशेष रेल्वे ११ ऑगस्टपासून

सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (09:41 IST)
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकजण दरवर्षी कोकणाकडे प्रस्थान करतात. त्याच पार्श्वभूमीवर यंदा आतापर्यंत दीडशे गाड्या रवाना करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. 
 
राज्य सरकार यासाठी विशेष रेल्वे सोडण्याचीही परवानगी दिली आहे. मध्य, पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला असून या गाड्या ११ ऑगस्टपासून सोडण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे.
 
मुंबई, ठाणे, पालघर, पुणे विभागांतून ४०० गाड्या सोडण्याची तयारी महामंडळाने ठेवली आहे. एसटीचे ग्रुप आरक्षणही उपलब्ध केले आहेत तसेच कोकणातून २३ ऑगस्टपासून परतीच्या प्रवासासाठी महामंडळाने आगाऊ आरक्षणही उपलब्ध केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती