शूज- तसे तर शूज गिफ्ट करणे अनेकांना पसंत नसतं. परंतु मुलींना नवीन सैंडल्स किंवा शूजची खूप आवड असते. गर्लफ्रेंडसाठी यंदा ऑलिव्ह ग्रीन किंवा लाइट ग्रे रंगाचे शूज गिफ्ट करु शकता. शिवाय मेमरी फोम चप्पल, बूट, शूज, हाय हिल्स सँडल, क्लोग्स इत्यादी उत्तम पर्याय असू शकतात. याशिवाय तुमची इच्छा असेल तर तुम्ही थंडीच्या दिवसात घातले जाणारे शूज देखील गिफ्ट करू शकता.
गॅझेट्स- हेडफोन, स्मार्ट वॉच, इअर बड्स, स्मार्टफोन इत्यादी गिफ्टही करू शकता. बजेट कमी असेल तर हेडफोन सहज मिळू शकतात. तसेच आजच्या काळात त्याचा वापर करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अशा परिस्थितीत तुमच्या मैत्रिणीला ही भेट खूप आवडू शकते. तुम्ही ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही माध्यमातून खरेदी करू शकता. तुमचे बजेट लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या पार्टनरला आवश्यक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स देऊ शकता.
ज्वेलरी- ज्वेलरी ही महिलांची पहली पसंत असते. लाइट वेट ज्वेलरी मुलींना खूप पसंत येते ही बजेट फ्रेंडली देखील असते. अशात जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला काही अनोखे गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर या नवीन वर्षात तुम्ही तुमच्या जोडीदाराला हार किंवा ज्वेलरी सेट गिफ्ट करू शकता. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही तुमच्या रेंजनुसार तुमच्या पार्टनरला गिफ्ट देऊ शकता. जर तुम्ही सोने खरेदी करू शकत असाल, तर तुम्ही त्यांना सोन्याचे झुमके किंवा नाकपुडी इत्यादी भेट म्हणून देऊ शकता.
वूलन विअर- हिवाळ्यात देण्यासाठी याहून चांगले गिफ्ट काय असेल. तुम्ही स्वेटर, जॅकेट, स्कॉर्फ गिफ्ट म्हणून देऊ शकता. मुलींना वॅरायटी खूप पसंत असते. अशात लगेच तुमचं गिफ्ट वापरण्यात येईल.