‘कोविड स्पेशल ट्रेन’मधून जवळपास ४० लाख रुपये सिगारेटची तस्करी

गुरूवार, 9 जुलै 2020 (17:39 IST)
लॉकडाऊनमध्ये परप्रांतीयांना घेऊन जाणाऱ्या ‘कोविड स्पेशल ट्रेन’मधून चक्क सिगारेटची तस्करी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दिल्लीच्या कस्टम विभागाने ४० लाख रुपये किंमतीच्या सिगारेट जप्त केल्या असून जुनी दिल्ली स्टेशवर ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
 
४.५ लाख सिगारेट जप्त
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार; लॉकडाऊनमध्ये धावणाऱ्या स्पेशल ट्रेनच्या माल डब्ब्यामधून या सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्त करण्यात आलेल्या सिगारेट बांगलादेशामधून आणल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या सिगारेटची एकूण किंमत जवळपास ४० लाख रुपये इतकी असून कस्टम विभागाने ‘पॅरिस’ ब्रँडच्या ४.५ लाख सिगारेट जप्त केल्या आहेत. याबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती