सीबीएसईने जाहीर केले आहे की २०२६ च्या १०वी आणि १२वीच्या दोन्ही परीक्षा १७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होतील. २०२६ मध्ये, सीबीएसई एनईपी-२०२० मधील शिफारशींनुसार दहावीसाठी दोन बोर्ड परीक्षा घेईल. सीबीएसईच्या अधिसूचनेनुसार, दहावी आणि बारावीच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतल्या जातील.
परीक्षा सकाळी १०:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत चालतील. सीबीएसईने सांगितले की पहिल्यांदाच परीक्षा सुरू होण्याच्या ११० दिवस आधी तारीखपत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना तयारीचा कालावधी जास्त मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळेल आणि शाळांसाठी परीक्षा व्यवस्थापन सोपे होईल.
दहावीच्या परीक्षा १७ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ पर्यंत चालतील. तर बारावीची परीक्षा १७ फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२६ पर्यंत घेतली जाईल. विद्यार्थी त्यांचे विषयवार डेटशीट थेट अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात आणि त्यानुसार परीक्षेची तयारी सुरू करू शकतात.