धक्कादायक : ऑनलाइन ऑर्डर केली शेव-टोमॅटो भाजी, पॅकेट उघडल्यावर भाजीमध्ये निघालीत हाडे

बुधवार, 6 नोव्हेंबर 2024 (13:31 IST)
मध्य प्रदेश मधील उज्जेन मध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे एक ग्राहकाने ऑनलाइन शेव-टोमॅटो भाजी मागवली. पण जेव्हा त्याने पॅकेट उघडले त्यामध्ये चक्क हाडे निघालीत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
 
या घटने नंतर ग्राहकाने थेट पोलीस स्टेशन गाठले व केस नोंदवली. सोबतच अन्न विभागमध्ये देखील तक्रार नोंदवली. त्यानंतर संबंधित हॉटेल विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार उज्जेनच्या खाती मंदिरामध्ये राजगढचे एक व्यक्ती थांबले होते. त्यांनी मंगळवारी झोमॅटो ऍप माध्यमातून शेव-टोमॅटो भाजी ऑर्डर केली होती. जेव्हा त्यांनी पार्सल उघडले तर त्यामध्ये हाडे निघालीत. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन मध्येतक्रार दाखल केली.   
 
अन्न विभागाच्या पथकाने तातडीने हॉटेलची तपासणी केली. फूड सेफ्टी ऑफिसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान हॉटेलच्या किचनमध्ये एकाच ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पदार्थ बनवले जात असल्याचे आढळून आले. या निष्काळजीपणामुळेच हा गोंधळ झाला. हॉटेलवर कडक कारवाई करत अन्न विभागाने हॉटेलचा खाद्य परवाना रद्द केला असून शेव-टोमॅटो भाजीचा नमुनाही तपासणीसाठी पाठवला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती