एक लाख रुपयांच्या मोबाईलसाठी डिलिव्हरी बॉयची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले

मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 (11:16 IST)
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लखनौच्या चिन्हाट मध्ये मोबाइलफोनची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या डिलिव्हरीबॉयची तिघांनी मिळून निर्घृण हत्या केली.भरत कुमार प्रजापती असे मयत व्यक्तीचे नाव आहे.  

आरोपींनी डिलिव्हरी बॉयचा गळा आवळून खून करून एक लाखाचे दोन मोबाइल आणि 35 हजार रुपये लुटले.त्या नंतर आरोपींनी  मृतदेहाचे तुकडे करून त्याच्याच बॅगेत  टाकले आणि इंदिरा केनॉल मध्ये फेकून दिले. 
मयत भरत हा 24 सप्टेंबर रोजी 49 ग्राहकांच्या सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी ऑफिसमधून बाहेर पडला.रात्री तो परत न ल्यामुळे ऑफिसच्या इंचार्जने त्याच्या कुटुंबियांना माहिती दिली आणि पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 

त्याच दिवशी डिलिव्हरी देण्यासाठी भरताला आरोपींनी त्याला घरी बोलावले आणि भारत दुपारी त्यांच्या घरी आल्यावर त्याला घरात ओढत नेले नंतर त्याचा गळा आवळून हत्या केली आणि पैसे आणि  मोबाईल लुटून  त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याच्यात बॅगेत भरून कालव्यात जाऊन फेकले.

पोलिसांनी भरतच्या मोबाईलचे नंबरची लोकेशन आणि कॉल डिटेल्सवरून आरोपी पर्यंत पोहोचले आणि त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली असून तिसरा फरार आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पथके तयार केली आहे. एसडीआर टीम घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्नात आहे. 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती