ब्रेक द चैन’ मोहिमेत मुंबईकर यशस्वी होण्याच्या मार्गावर

सोमवार, 3 मे 2021 (08:02 IST)
ब्रेक द चैन’ मोहिमेत मुंबईकर यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. रविवारी मुंबईत ३ हजार ६७२ नव्या कोरोनाबाधित आढळले असून ७९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ५ हजार ५४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आता मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ५६ हजार २०४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार ३३० जणांचा मृत्यू झाला असून ५ लाख ८३ हजार ८७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
रविवारी २ ८ हजार ६३६ कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ५४ लाख ९० हजार २४१ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या ५७ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आज मृत्यू झालेल्या ७९ रुग्णांपैकी ३५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ४८ रुग्ण पुरुष आणि ३१ रुग्ण महिला होत्या. ४ रुग्णांचे वय ४० वर्षाखाली होते. ४३ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित ३२ रुग्ण ४० ते ६० वयोगटामधील होते.
 
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८९ टक्के इतका झाला आहे. २५ एप्रिल ते १ मे २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.६६ टक्के असून मुंबईतील दुप्पटीचा दर १०३ दिवस झाला आहे. सध्या मुंबईत सक्रिय कंटेनमेंट झोन १०७ आणि सक्रिय सीलबंद इमारती ९०३ आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती