सर्व्हिस सेंटरला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनेक अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.
आम्हाला रात्री 9 च्या सुमारास माहिती मिळाली की मुंबईतील कांजूरमार्ग पूर्व येथील सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. अग्निशमन दलाच्या 10-12 गाड्या येथे पोहोचल्या आहेत. स्थानिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. बचाव कार्य चालू आहे: अधिक माहिती देताना घटनास्थळी उपस्थित असलेले डीसीपी प्रशांत कदम यांनी सांगितले की, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. तसेच सर्व्हिस सेंटरला लागलेली भीषण आग पाहता स्थानिकांना परिसरातून बाहेर काढण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.