वर्षा बंगल्यामध्ये कोरोनाचा शिरकाव

मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (08:05 IST)
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासगृहात अर्थात वर्षा बंगल्यामध्ये कोरोनाचा  शिरकाव झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओएसएडी अर्थात विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. नाईक यांना कोरोना झाल्याने पुढील लक्षणासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
वर्षावरील कर्मचाऱ्यांना कोणताही धोका संभवू नये, यासाठी निवासस्थानातील कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणी करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आणि संपूर्ण वर्षा निवासस्थानात सॅनिटायझेशन करण्यात आलेलं आहे. दरम्यान याआधी मार्च महिन्यात वर्षामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाली होती.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती