नवी मुंबईच्या कामोठे डेंटल कॉलेजच्या चार सिनिअर विध्यार्थ्यानी एका ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कॉलेजात सध्या रॅगिंग करण्याचा प्रकार गुन्हा आहे. या प्रकरणी कॉलेजातील चौघांना निलंबित करण्यात आले आहे. कॉलेज ने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी चौघांनी या जुनिअर विद्यार्थ्याला आधी दारू पाजली नंतर त्याला पॅण्टमध्ये लघवी करण्यास सांगितले. सदर घटना जुलै मधली असून पीडित विद्यार्थ्याने आपल्या पालकांना या छळाची माहिती आत्ता दिली. ज्युनिअर चा हा विद्यार्थी पहिल्या वर्षात शिकत असून कामोठे येथे आपल्या तीन मित्रांसह राहत होता आणि हे चोघे तिसऱ्या वर्षात शिकणारे वरच्या मजल्याच्या फ्लॅट वर राहत होते. या चोघांनी ज्युनिअर विद्यार्थ्याला आपल्या फ्लॅट मध्ये बोलवून त्याला बळजबरीने दारू पाजली आणि पीडित मुलाला लघवी आल्यावर त्याला पँट मध्येच लघवी करण्यास बाध्य केले.