भाजपची तयारी जोरात, हे पाच प्रमुख चेहरे मंत्रिमंडळात राहणार!

शनिवार, 30 नोव्हेंबर 2024 (15:47 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीने निर्णायक विजय मिळवला आहे. महायुती आता सरकार स्थापनेच्या तयारीत व्यस्त आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबतच इतर मंत्रिपदांसाठीही नावांची निवड होणे बाकी आहे.भाजपच्या या नेत्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे 5 चेहरे मंत्रिमंडळात कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे आहे चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे ,सुधीर मुनगंटीवार,गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील
 
चंद्रकांत पाटील दादा यांनी महसूल व सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळले असून कोथरूड मतदार संघातून 1 लाख 12 हजार हून अधिक मताने विजयी झाले आहे. ते सध्या वस्त्रोद्योग मंत्री म्हणून आपले स्थान कायम ठेवू शकतात.
सुधीर मुनगंटीवार यांनी विदर्भात सातव्यांदा विजय मिळवून नवा विक्रम केला. ते सध्या राज्यातील आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीची माहिती दिली असून ते वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कायम राहू शकतात. 
 
गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री म्हणून कारभार सांभाळला आहे. यांनी अनेक गावांच्या विकासासारखी मोठी कामे केली आहेत. ते पुन्हा भाजपचा चेहरा बनू शकतात. 
 
 राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रीपदाचा कार्यभार चोखपणे सांभाळला आहे. त्यांचा भाजपच्या विजयामध्ये मोलाचा वाट आहे ते पुन्हा भाजपचा चेहरा बनू शकतात. 
 
चंद्रशेखर बावनकुळे यांना जनतेचा पाठिंबा मिळाला असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून कामकाज हाताळले आहे. तसेच त्यांनी राज्याच्या विकासासाठी काम केले आहे त्यांना देशील मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती