पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौचरी हॉल्टजवळ मजूर रुळांवर काम करत होते. यावेळी लोहित एक्स्प्रेस गाडीने तीन मजुरांना धडक दिली. या घटनेत रेल्वेच्या धडकेत दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. तसेच मुकेश कुमार आणि अर्जुन शर्मा अशी मृतांची नावे असून ते जिल्ह्यातील पसराहा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. जखमी मजुराला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.