MSRTC च्या अधिकाऱ्यानी केली महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी, गुन्हा दाखल
शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (14:17 IST)
सध्या राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रकरणात वाढ होत असल्याने महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला असून दररोज महिलांना शारीरिक व मानसिक त्रासातून जावे लागते.
मुंबईतून असेच प्रकरण समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका उच्च अधिकाऱ्याने महिलेकडून शारीरिक सुखाची मागणी केली असून महिलेने उच्च अधिकाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रकल्पांसाठी बाह्य सल्लागारासोबत काम करणाऱ्या एका महिलेने आरोप केला आहे की , अधिकाऱ्याने तिला आपल्या केबिन मध्ये बोलावले आणि तडजोड करण्यास शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच माझे काम केले तर तुला बढती देण्यात येईल असे म्हटले.
पीडित महिला गेल्या सहा वर्षांपासून एका उच्च बहुराष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापनात सल्लागार आहे. ही महिला महाराष्ट्र परिवहन महामंडळासाठी कंत्राटावर काही प्रकल्प व्यवस्थापनाची कामे हाताळते.
सदर घटना मे महिन्यांत घडली असून आरोपीने महिलेला मुंबई सेंट्रल कार्यालयातील एका केबिन मध्ये बोलावले.नंतर महिलेला थांबायला सांगितले.महिलेला ईमेल लिहायला सांगितले नंतर आरोपी टॉयलेट मध्ये गेला व परत आल्यावर महिलेवर वाकला.आणि शारीरिक सुखाची मागणी केली. नंतर पीडित घाबरून तिथून निघाली.
संध्याकाळी आरोपीने तिला फोन केला आणि तडजोड करण्याचे विचारले असे केल्यास तुला चांगली बढती मिळेल असे म्हटले. पीडितेने नकार देता आरोपीचा कॉल रेकॉर्ड केला आणि सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे दिली. वरिष्ठ अधिकारयांनी या प्रकरणाची माहिती लैंगिक छळ प्रतिबंधक समितीला दिली.
लैंगिक छळ प्रतिबंधक समितीने हे प्रकरण महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडे दिले.एक अंतर्गत समितीचे स्थापन करण्यात आले. या मध्ये आरोपी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांचा आणि ओळखीच्या लोकांचा समावेश आहे.
एमएसआरटीसीच्या अंतर्गत समितीने कारवाई न केल्यामुळे तिला असहाय्य वाटत असल्याचा दावा पीडितेने केला आहे.महिलेने 1 सप्टेंबर रोजी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलीस साक्षीदार आणि आरोपींचे जबाब नोंदवणार असल्याची महिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.