महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी रात्री अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते सचिन कुर्मी यांची मुंबईत काही जणांनी धारदार शस्त्राने हत्या केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सचिन यांना रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीमागे कुर्मी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. ही घटना मध्यरात्री 12.30 च्या सुमारास घडल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून जखमी सचिन यांना जेजे रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तपासाअंती सचिन यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून मात्र सचिन यांच्यावर हल्ला कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 2-3 जणांचा सहभाग होता. या घटनेमुळे सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.