परमबीर सिंह यांच्याविरोधात अजून एक गुन्हा दाखल

शनिवार, 31 जुलै 2021 (08:14 IST)
बनावट गुन्हे दाखल करून त्यामार्फत खंडणी उकळण्याच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये परमबीर सिंह यांच्यासोबतच इतर ८ पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. केतन मनसुखलाल तन्ना नामक ५४ वर्षीय व्यावसायिकानं दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी देखील परमबीर सिंह यांच्याविरोधात बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केलेल्या खंडणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची देखील स्थापना करण्यात आली आहे.
 
केतन मनसुखलाल तन्ना या ५४ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. केतन तन्ना आणि त्यांच्या पत्नीला खंडणीसाठी धमकावलं जात होतं,असा आरोप तन्ना यांचे सह तक्रारदार सोनू जालान यांनी केला आहे. यामध्ये परमबीर सिंह यांच्यासोबतच माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा,रवी पुजारी, एन. टी. कदम, राजकुमार कोथमिरे आणि दोन पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश असल्याचं जालान यांनी सांगितलं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती