हिरवी मिरची - एक
तेल - तळण्यासाठी
कृती-
सर्वात आधी उकडलेले बटाटे आणि मटार चांगले मॅश करावे. एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे आणि हिंग घालावे. नंतर त्यात हिरवी मिरची, धणेपूड, जिरेपूड, तिखट, गरम मसाला आणि आमचूर पावडर घालावी.आता त्यात मॅश केलेले मटार आणि बटाटे घालावे. मीठ घालून परतवून घ्यावे. दोन मिनिट शिजवल्यानंतर कोथिंबीर घालावी. आता समोशाची पट्टी त्रिकोणी आकारात घडी करून त्यात तयार मटर मसाला भरावा. समोशाच्या कडा पाण्याने ओल्या करून घट्ट बंद करा म्हणजे समोसा उघडणार नाही. हे समोसे चांगले दाबून पॅक करा.आता समोसे तळून घ्यावे. सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळावे .तळलेले समोसे पेपर नॅपकिनवर काढा आणि जास्तीचे तेल शोषून घेऊ द्या.तर चला तयार आहे आपली मटार समोसे रेसिपी, चटणीबरोबर नक्कीच सर्व्ह करा.