कावळा भाकरी खाणार इतक्यात खालून कोल्ह्याचा आवाज आला अरे कावळा दादा, मी ऐकले आहे की इथे कोणीतरी अतिशय मधुर आवाजात गाणे गाते. तो तूच आहेस का? कोल्ह्याच्या तोंडून त्याच्या आवाजाची स्तुती ऐकून कावळा मनातल्या मनात खूप खुश झाला आणि त्याने होकारार्थी मान हलवली. यावर कोल्हा म्हणाला, कावळे दादा , चेष्टा का करताय? एवढ्या गोड आवाजात तू गात गातोस मी ऐकले आहे. पण मला यावर विश्वास नाही. हे मी कसं स्वीकारू? गाऊन सांगाल तर मी मानेन.