Janmashtami 2024 संपूर्ण भारतात साजरा केला जाणार आहे. यादिवशी भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. धणे पंजीरी शिवाय तुम्ही पपई बर्फी, रोज कलाकंद, दूध पेढा यांचा देखील नैवेद्य दाखवू शकतात. तर चला जाणून घ्या रेसिपी.
1. दूध पेढा-
एका कढईमध्ये दूध घालून उकळण्यासाठी ठेऊन द्यावे. आपण ढवळत असलेले दूध घट्ट होताना दिसेल तेव्हा यामध्ये 1/2 कप साखर आणि 1/2 चमचा वेलची पूड मिक्स करा. यानंतर लहान गॅस वर पाच मिनिट ठेवावे. तोपर्यंत जोपर्यंत दूध आटत नाही. आता आटलेले दूध एका प्लेट मध्ये काढून घ्या. थंड झाल्यानंर हाताला तूप लावून आकार देऊन पेढे बनवावे.
एका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करावे. पपईची प्युरी आणि तुकडे यामध्ये टाकून शिजवून घ्यावे. तोपर्यंत जोपर्यंत यामधील पाणी आटत नाही. आता 1/3 कप साखर मिक्स करून शिजवावे. साखरेमधील पाणी कमी झाल्यानंतर यामध्ये 1/2 कप मिल्क पाउडर मिक्स करावी. थोड्या वेळाने गॅस बंद करावा. एक ट्रे मध्ये तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण घालावे. तसेच ड्राय फ्रूट्स टाकून रूम टेंपरेचर वर दोन तास सेट होण्यासाठी ठेवावे. मग तुम्हाला आवडेल त्या आकारात कापावे.