नातं असं असावं -नवं विवाहित असल्यास या गोष्टी लक्षात ठेवा

शुक्रवार, 5 मार्च 2021 (08:45 IST)
एक स्त्री आपल्या आयुष्यात बऱ्याच भूमिका निभावते. एक आई, एक मुलगी, एक बहीण, मित्र इत्यादी. मुलीचे लग्न झाल्यावर तिचे संपूर्ण आयुष्य बदलते. तिच्यावर तिच्या सासरच्या लोकांची संपूर्ण जबाबदारी असते. नवऱ्याच्या म्हणण्यानुसार सासरच्या इतर मंडळींच्या मतानुसार त्यांना वागावे लागते. कधी कधी काही मुली लग्नानंतर गोंधळून जातात. अशा परिस्थितीत काही टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून त्या सासरी देखील सर्वांना आपलेसारखे करून घेतात. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
* आपल्या सासरच्यांची काळजी घ्या-
घरात सून म्हणजे सर्व काही असते. घराचे आनंद तिच्या आनंदावर अवलंबून असते. सासरचे लोक त्या सुनेवरच निर्भर असतात. अशा परिस्थितीत घरातील सदस्यांना रागावू देऊ नका. त्यांची काळजी घ्या. त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष्य द्या. त्यांना वेळेवर जेवण द्या. त्यांच्याशी हितगुज करा. सासू सासऱ्यांच्या औषधाची काळजी घ्या. असं केल्याने आपले नाते त्यांच्याशी दृढ होईल.
 
* लहान मुलांशी हीळून मिसळून राहा- 
घरात लहान मुलं असतील तर त्यांना प्रेमाची वागणूक द्या. त्यांची काळजी घ्या. त्यांच्या गरजा पूर्ण करा. असं केल्याने सासरच्या लोकांच्या दृष्टीत आपली चांगली प्रतिमा बनेल आणि आपल्याला अधिक प्रेम आणि मान मिळेल. आपल्याला कधी एखाद्या गोष्टींवर ऐकावे लागेल तर नाराज होऊ नका किंवा वाईट वाटून घेऊ देखील  नका.   
 
* पतीची काळजी घ्या-
लग्न करून आल्यावर ज्या प्रकारे नवरा आपली काळजी घेतो  त्याच प्रमाणे आपल्याला देखील त्याची काळजी घ्यायला पाहिजे. सकाळी ऑफिसला  जाताना त्याला काय पाहिजे काय नको, तसेच त्याच्या साठी जेवण तयार करणे, दिवसातून त्याला एकदा तरी फोन लावणे, त्यांच्या आवडीचे जेवण बनविणे. त्यांना समजून घ्या आणि त्यांचे ऐकून घ्या. असं केल्याने आपण पतीला आनंदी ठेवू शकता.  
 
* आपल्या जबाबदाऱ्यांची काळजी घ्या- 
सासरी गेल्यावर प्रत्येक मुलीने तिची जबाबदारी समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाशी सलोख्याचे नाते निर्माण केले पाहिजे. सकाळी लवकर उठणे, प्रत्येकाच्या आवडी निवडीची काळजी घेणं, स्वयंपाक करणे. सासू उठण्यापूर्वीच आपण उठावे. सासरचे गाराणे माहेरी करू नका सासरच्या काही गोष्टी माहेरी सांगू नका. असं केल्याने आई वडील आणि सासू-सासऱ्यांच्या संबंधात दुरावा येऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती