प्रत्येक आईला बाळाला स्तनपान करणे ही एक आनंददायी भावना आहे. ही अशी वेळ असते जेव्हा आई आणि बाळामध्ये एक घट्ट नातं निर्माण होत.परंतु आईने स्तनपानाच्या वेळी काही सावधगिरी बाळगली पाहिजे जेणे करून बाळाला कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये. चला तर मग जाणून घेऊ या. आईने कोणत्या प्रकारची काळजी घ्यावयाला पाहिजे.
* स्तनपानाच्या वेळी बाळाला झोपू देऊ नका-
बाळाला दूध पाजताना त्याच्या वर लक्ष ठेवा. बाळा मधूनच झोपतात त्यांचे पोट भरलेले नसते. जर बाळ झोपी जात असेल तर त्याच्या गालावर हळुवारपणे हात फिरवून जागे करा.
* स्तनाची स्वच्छता करावी-
स्तनाची स्वच्छता न करता बाळाला दूध पाजणे टाळावे, या मुळे त्याचे पोट बिघडू शकते. स्तन नेहमी कोमट पाण्याने धुऊन स्वच्छ करावे.