बाजारात हल्ली टेराकोटाची भांडी परत दिसू लागली आहेत. त्यांचा वापरसुद्धा सुरू झाला आहे. ही भांडी दिसायला फारच सुंदर असतात. तुम्हाला ग्लासवेयर किंवा बोन चायनाच्या भांड्यांचा कंटाळा आला असेल तर बदल म्हणून तुम्ही टेराकोटाची भांडी वापरू शकता.
हल्ली बाजारात टेराकोटाची भांडी ओव्हन आणि मायक्रोव्हेव प्रूफ रेंजमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. ही भांडी थेट गॅसवर ठेवू शकता.
ग्राहकांच्या आवडीनुसार या भांड्यांना सिरॅमिकच्या वेगवेगळ्या प्रकारात तयार केले जाते. डिझायनर टेराकोटा टेबल वेयर्समध्ये कमी प्रमाणात शिसे असते. म्हणून या उत्पादनांना 'झिरो लेड' लेबल लावलेले असते. ही भांडी कडक बनविण्यासाठी 1200 डिग्री सेंटीग्रेडच्या तापमानापर्यंत तापवली जातात. बारीक नक्षीमुळे ती स्टायलिश दिसतात.
किचनला थोडा वेगळा 'लूक' देण्यास इच्छुक असाल तर वेगवेगळ्या शेप्स आणि साइजमध्ये टेराकोटाचे मग्स किंवा कप खरेदी करून स्वयंपाकघर सजवू शकता.
घरी वापरण्यासाठी प्लॅस्टिकच्या वस्तूंऐवजी इको-फ्रेंडली टेराकोटा भांडी वापरू शकता. टेराकोटा डिश सेट्स आणि सर्विंग डिशेसही आहेत. त्यामुळे डायनिंग टेबलचे सौंदर्य वाढते.
हल्ली बाजारात ह्या वस्तू उपलब्ध होतातच. शिवाय हस्तशिल्प प्रदर्शनातून बेल्सच्या शेपमध्ये डेकोरेटिव्ह बल्ब होल्डर्स, कॅक्टस किंवा प्लांट होलर्डस किंवा डायनिंग टेबलावर ठेवण्यासाठी वेटर्स बेलसुद्धा खरेदी करू शकता.