पावसाळ्यात कपड्यांची दुर्गंधी या प्रकारे दूर करा

गुरूवार, 29 जुलै 2021 (09:11 IST)
पावसाळा आपल्या पसंत असला तरी या हंगाम्याची सर्वात वाईट बाब म्हणजे कपड्यांना येणारी दुर्गंधी. या हंगामात, बर्‍याचदा टॉवेल्समधून दमट वास येऊ लागतो. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो कारण ओले किंवा ओलसर टॉवेल्समध्ये बॅक्टेरिया वाढतात. यामुळे, त्वचेशी संबंधित समस्या होण्याची शक्यता वाढते. परंतु प्रत्येक समस्यावर उपाय आहे तर जाणून घ्या यावर काय उपाय आहे ते- 
 
1. बाथरूममध्ये आर्द्रतेमुळे टॉवेल्समध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागतात. अशाने टॉवेलचा वापर त्वचेशी संबंधित कोणतीही समस्यांना आमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणून, पावसाळ्याच्या दिवसात टॉवेल केवळ कोरड्या ठिकाणी ठेवा.
 
2. बरेचदा अंघोळ झाल्यावर लोक कुठेही टॉवेल्स फेकून देतात. अशा परिस्थितीत टॉवेलला कोणत्याही स्टँडवर किंवा दोरीवर ठेवा जेणेकरून ओलावा दूर होण्यास मदत होईल.
 
3. पावसाळ्यात दोन टॉवेल्स वापरा. आणि दर 2 दिवसांनी टॉवेल्स धुवा. ज्यामुळे वास येणार नाही आणि बॅक्टेरिया वाढणार नाहीत.
 
4. पावसाळ्यात कपडे सुकत नसल्यास पंखेच्या हवेमध्ये सुकवा.
 
5. पावसाळ्यात कपडे धुण्याचा साबण जरा अधिक प्रमाणात करावा. सोबतच जंतुनाशक द्रव देखील वापरु शकता ज्याने कपड्यातून दुर्गंधी घालवण्यास मदत होईल. तरी कपडे ओलसर जाणवत असतील तर आपण त्यावर प्रेस देखील करु शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती